
मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपटांची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प करून अदित्यराजे मराठे प्रॉडक्शनने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या निर्मितीसंस्थेचा महत्त्वाचा मराठी चित्रपट ‘झुंबाड’ याचे संपूर्ण शूटिंग नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक आदित्यराजे मराठे व सह दिग्दर्शक चेतन सागडे हे आहेत.
चित्रपटाचे पोस्ट-प्रॉडक्शन कार्य सध्या सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
याचबरोबर प्रेक्षकांसाठी आनंदाची आणखी एक बातमी म्हणजे अदित्यराजे मराठे प्रॉडक्शन आता आपल्या नव्या हिंदी चित्रपटाची घोषणा करत आहे. या नव्या चित्रपटाचे नाव आहे ‘लखनवी परिंदे’ हे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सलमान सज्जडी हे असून लखनऊ येथे या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. हा हिंदी चित्रपट पूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीवर आधारित असून त्यात प्रेक्षकांना भावनिक प्रवासाबरोबरच एक्शन थ्रिलर, संघर्ष, स्वप्नांची उड्डाणे आणि नवे सामाजिक भान पाहायला मिळणार आहे.
‘लखनवी परिंदे’च्या माध्यमातून नवे कलाकार, ताकदीचे तंत्रज्ञ आणि प्रभावी कथाकथनाची सांगड घालून एक आगळावेगळा अनुभव देण्याचा संकल्प निर्मात्यांनी केला आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनची जोरदार तयारी सुरू असून येत्या १५ दिवसात या चित्रपटाचे भव्यदिव्य शूटिंग सुरू होणार आहे.
अदित्याराजे मराठे प्रॉडक्शनचे ध्येय प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर विचारांना चालना देणारे आणि मनावर ठसा उमटवणारे चित्रपट देण्याचे आहे. ‘झुंबड’ (मराठी) आणि ‘लखनवी परिंदे’ (हिंदी) या दोन्ही चित्रपटांतून हे ध्येय किती उत्तम रीतीने साकार होते याची प्रतीक्षा संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि रसिक प्रेक्षक करत आहेत.