

केंद्रीय निवडणूक आयोगाने 24 तासामध्ये दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मतदारयादीतून मतदाराचे नाव वगळण्याबाबतच्या प्रक्रियेच्या नियमात पारदर्शकता आणल्यानंतर आता मतमोजणीबाबतही निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगानं मतमोजणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि गतीमान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यापूर्वी ईव्हीएम (Electronic Voting Machine) मतमोजणी पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण होण्याआधी सुरू होऊ शकत होती. मात्र, आता आयोगानं स्पष्ट केलंय की पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण होईपर्यंत शेवटच्या दुसऱ्या फेरीची ईव्हीएम मतमोजणी सुरू करता येणार नाही. यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम, वाद किंवा तक्रारी टाळता येणार आहेत. अनेकदा पोस्टल मतदान मोजणीच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या आहेत.